Sunday, 31 March 2013

सेवांगणातला मराठी भाषा गौरव दिन २०१३



आज २७-०२-२०१३. कुसुमाग्रजांचा जन्मदिन. ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शने आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो. आज २७-०२-२०१३. मालवण नगरवाचन मंदिरातला ग्रंथप्रदर्शनाचा उदघाटन सोहळा आटोपून घरी निघालो. वाटेवर डावीकडे साने गुरुजी वाचनालय होते. शरदराव म्हणाले तिथे काय आहे पाहूयात. मला एका महत्त्वाच्या कामामुळे परतायची घाई होती. म्हटले धावती भेट देऊयात कां? चालेल म्हणाले. गेलो. तिथे पण अतिशय साधेपणाने पण नीटनेटके ग्रंथप्रदर्शन मांडले होते. त्यांच्या अनुमतीने काढली प्रकाशचित्रे.




इथेही मंदिराला साजेसे प्रसन्न, पवित्र वातावरण आहे. हसतमुख आणि उत्साही ग्रंथपालांचे व सेवकांचे आभार मानून निघालो.

No comments:

Post a Comment